समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सन्मानाचे जीवन मिळावे, हा शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेचा मूलभूत उद्देश आहे.
समाजातील वंचित, गरीब, महिला, विद्यार्थी, शेतकरी, दिव्यांग आणि युवक यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू. केवळ मदत करण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन देणे आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, ही आमची भूमिका आहे.
शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे, कौशल्य हे स्वावलंबनाचे माध्यम आहे आणि सेवा ही समाजाशी जोडणारी शक्ती आहे. या विचारांवर विश्वास ठेवून आम्ही विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
लोकसहभागातून सक्षम, संवेदनशील आणि स्वावलंबी समाज घडविण्याचा आमचा निर्धार आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने या कार्यात सहभागी व्हावे आणि आपल्या परीने योगदान द्यावे, हीच अपेक्षा